Dehuroad crime News : गायीच्या सडावर कोयता, कुऱ्हाडीने वार; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गायीला निर्दयतेने वागवून तिच्या सडावर कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून गायीला जखमी केले. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी चिंचोली येथे घडली.

अमित शुक्राचार्य जाधव, सुनील लहू जाधव (दोघेही रा. चिंचोली, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बाळू विठ्ठल बालघरे (वय 45, रा. चिंचोली, ता. हवेली) यांनी रविवारी (दि. 29) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे चार वर्षांची पाळीव गाय आहे. 17 नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांची गाय अमित जाधव याच्या हरभऱ्याच्या शेतात गेली. त्यावेळी आरोपींनी गायीला निर्दयतेने वागवून कोयता आणि कुऱ्हाडीने तिच्या सडावर मारले. यामध्ये गायीला गंभीर दुखापत झाली आहे.

याबाबत अमित आणि सुनील या दोघांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 429, प्राण्यांना निर्दयतेने वागवणे कायदा कलम 3, 7, प्राणी संरक्षण कायदा कलम 5, 9, क्रिमिनल लॉ ऍक्ट कलम 3, 7, आर्म ऍक्ट कलम 4 (25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.