Dehuroad : पालकांशी किरकोळ वाद अन् अल्पवयीन मुलींनी सोडले घर; मुंब्र्यातील मुलींना देहूरोड पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – मुंब्रा येथे राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींनी (Dehuroad) पालकांसोबत किरकोळ वाद झाल्याने घर सोडले. त्या दोघी रेल्वेने पुण्याच्या दिशेने जात असताना देहूरोड येथे रेल्वे पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेतले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 16 आणि 14 वर्षाच्या दोन मुली आपल्या पालकांसोंबत किरकोळ वाद झाल्याने घरातून बाहेर पडल्या. त्या रेल्वेने देहूरोड येथे आल्या. पोलीस कर्मचारी एस अंधारे यांनी मुलींना ताब्यात घेतले.

याबाबत त्यांनी सहायक निरीक्षक सुप्रिया जगताप यांना फोनद्वारे माहिती दिली. मात्र त्या मुलींना पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात पाठविण्यासाठी सर्व रेल्वेगाड्या रात्री निघून गेल्या होत्या. त्यामुळे जगताप यांनी रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्तर यांच्याकडे रात्रपाळी कर्तव्या वरील महिलेची मदत घेण्यास सांगितले.

सहायक निरीक्षक जगताप लोणावळा परिसरात रेल्वेने गस्त करीत (Dehuroad) होत्या. त्यामुळे त्यांनी पुणे लोहमार्ग नियंत्रण कक्ष येथे माहिती देऊन नियंत्रण कक्षातून महिला कर्मचारी आल्हाट, वाघमारे यांना वाहन घेऊन पाठविले.

Maharashtra : स्वातंत्र्यदिनी राज्यपालांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण; तर इतर जिल्ह्यात ‘हे’ मंत्री करणार ध्वजारोहण

त्यानंतर दोन अल्पवयीन मुलींना पुणे पोलीस ठाण्यात आणले. ठाणे अंमलदार सहायक उपनिरीक्षक गायकवाड, महिला कर्मचारी शेंडगे व एस अंधारे यांनी दोन्ही मुलींकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नाव व पत्ता सांगितला. त्या ठाण्याजवळील मुब्रा येथे राहण्यास असून किरकोळ भांडणाच्या कारणावरून त्यांनी घर सोडल्याचे सांगितले.

रेल्वे पोलिसांनी त्या मुलींच्या पालकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्या अल्पवयीन मुलींना कर्वे रोड येथील सेंट क्रिस्पीन संस्थेत ठेवण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.