Dehuroad News : काम देण्याच्या बहाण्याने बोलावून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – काम देण्याच्या बहाण्याने एकाला बाहेर बोलावून पट्ट्याने व हाताने मारहाण केली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी साडेसहा वाजता देहूगाव येथील अभिलाषा पार्क सोसायटी येथे घडली.

दिलीप खंडू आमले (वय 47, रा. अग्निहोत्री सोसायटी, विठ्ठलवाडी, देहूगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पांडुरंग सुदाम शेडानी (रा. संत तुकाराम शाळेसमोर, देहुगाव) आणि त्याचा एक साथीदार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पांडुरंग हा फिर्यादी आमले यांच्या मावस सास-याचा भाऊ आहे. त्याने आणि त्याच्या एका साथीदाराने आमले यांना काम देण्याच्या बहाण्याने देहूगाव येथील अभिलाषा पार्क सोसायटी येथे बोलावून घेतले. आमले तिथे आले असता आरोपींनी काहीही कारण नसताना आमले यांना शिवीगाळ करत हाताने व पट्ट्याने मारहाण केली.

या मारहाणीत आमले जखमी झाले आहेत. त्यांनी याबाबत देहूरोड पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.