Dehuroad News : महिलेच्या कुटुंबीयांना विष घालून मारण्याची व स्वतः आत्महत्या करण्याची धमकी

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने महिलेचा पाठलाग केला. तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर तिच्या घरच्यांना विष घालून मारून टाकण्याची व स्वतः आत्महत्या करण्याची धमकी संबंधित व्यक्तीने दिली. ही घटना सन 2019 ते 3 जानेवारी 2022 या कालावधीत विठ्ठलवाडी देहूगाव ते थेरगाव येथे घडली.

बालाजी सुवर्णकार (वय 45, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कामाला जात असताना तसेच कामावरून घरी येताना आरोपी बालाजी याने पाठलाग केला. तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. आरोपीने महिलेला हा प्रकार कोणास सांगितला तर तुझ्या घरच्यांना विष घालून मारून स्वतः आत्महत्या करील, अशी धमकी दिली. फिर्यादीने आरोपीला बोलण्यास नकार दिला तरी देखील त्याने महिलेचा पाठलाग करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.