Chinchwad News : शहरात चोरीच्या आठ घटना उघड; चार दुचाकींसह रिक्षा, कंपनीतील साहित्य, रोकड, दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या आठ घटना उघडकीस आल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी चो-या करून दोन लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सोमवारी (दि. 3) एमआयडीसी भोसरी, पिंपरी, सांगवी, निगडी, हिंजवडी, चिखली पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. नितीन शंकर जितुरी (वय 51, रा. धनकवडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी मधील फोकस रोबोटोमेशन प्रा ली या कंपनीतून अज्ञात चोरटयांनी 53 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेले.

पिंपरी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. स्मिता मोहन मसुरे (वय 48, रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. मसुरे यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 27 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

शिवप्रकाश जगन्नाथ कोरी (वय 48, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोरी यांनी त्यांची 7 हजारांची तीनचाकी रिक्षा त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमधून रिक्षा चोरून नेली.

सुजय प्रदीप पाटील (वय 28, रा. यमुनानगर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील यांच्या इको गाडीचा 40 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेला आहे.

गणेश प्रकाश खोकराळे (वय 36, रा. रावेत) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांची 25 हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे. सतेंद्र संतोषकुमार सिंग (वय 29, रा. सुतारवाडी, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंग यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली.

तानाजी राजाराम पवार (वय 37, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार यांनी त्यांची दुचाकी साने चौकातील एका दुकानासमोर पार्क केली होती. तिथून चोरट्यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. संदीप अशोक शेट्टी (वय 32, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी अजमेरा कॉलनी, पिंपरी येथून चोरून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.