Dehuroad : घरात घुसून महिलेवर कोयत्याने हल्ला

एमपीसी न्यूज – महिलेच्या पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाने महिलेच्या घरात घुसून तिला कोयत्याने मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 18) रात्री अकराच्या सुमारास विकासनगर येथे घडली.
साजिदा मेहबूब शेख (वय 35, रा. विकासनगर) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हुसेन उर्फ डब्बू यामीन शेख (रा. पारशी चाळ देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिदा आणि त्यांचे पती एकदा कारमधून जात असताना हुसेन याच्याशी त्यांचा वाद झाला. या वादाच्या कारणावरून हुसेन याने मंगळवारी रात्री साजिदा यांच्या घरात घुसून त्यांच्यावर त्याने वार केले.
यामध्ये साजिदा यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर इजा झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून ते देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.