DehuRoad : डुकराचे मटण खाण्यासाठी जबरदस्ती करून विवाहितेला जीवे मारण्याची धमकी

तसेच तिच्या दिराने शरीरसुखाची मागणी केली. : Threatened to kill a married woman by Forced to eat pork

एमपीसी न्यूज – शिवीगाळ करून डुकराचे मांस खाण्यासाठी जबरदस्ती करून एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या दिराने शरीरसुखाची मागणी केली. ही घटना 11 जून ते 7 ऑगस्ट दरम्यान गांधीनगर, देहूरोड येथे घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार तिचा पती गोविंद शंकर चौधरी (वय. 22), सासू मनिषा शंकर चौधरी (वय, 45), दिर राजू शंकर चौधरी (वय, 24, सर्व रा. गांधीनगर, देहूरोड ) यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 11 जून ते 7 ऑगस्ट पर्यंत आरोपी पती, सासू आणि दिराने विविध कारणावरून पीडित महिलेचा छळ केला. आरोपींनी शिवीगाळ करुन पीडित महिलेला डुकराचे मटण खाण्यासाठी जबरदस्ती करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच माहेरहून गाडी आणण्यासाठी सक्ती करीत मानसिक आणि शाररिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच पीडित महिलेला पतीने पट्टयाने मारहाण करून दुखापत केली आणि दिरानं शिवीगाळ करुन शारिरिक संबंधाची मागणी करुन विनयभंग केला असं पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.

देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.