Dehuroad : रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 23) दुपारी एकच्या सुमारास बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ झाला. अद्याप मृत तरुणाची ओळख पटलेली नाही.

रेल्वे पोलीस पुरुषोत्तम कर्दळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे वय अंदाजे 25 वर्ष असून रंग गोरा, उंची 5.8 फूट आहे. त्याच्या उजव्या हातावर ‘साईराम’ असे गोंदलेले आहे. तर डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ इंग्रजीत R असे लिहिलेले आहे. राखाडी रंगाचा फूल शर्ट, त्यावर राखाडी रंगाचे जॅकेट, निळी जीन्स घातलेली आहे.

वरील वर्णनाच्या तरुणाबाबत माहिती असल्यास देहूरोड रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे. हा अपघात रेल्वेतून खाली पडल्याने झाला आहे किंवा रेल्वे रूळ ओलांडताना झाला आहे, याबाबत रेल्वे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.