Sangvi : बीआरटीएस मार्गिकेमधून भरधाव जाणाऱ्या कारची रस्ता दुभाजकाला धडक

एमपीसी न्यूज – बीआरटी मार्गातून भरधाव वेगात जाणा-या सफारी कारने रस्ता दुभाजकाला धडक दिली. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री दहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली. घटनेनेनंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास सफारी कार (एम एच 14 / ए व्ही 7007) भोसरीकडून पिंपळे सौदागरच्या दिशेने बीआरटी मार्गातून जात होती. कासारवाडी येथील उड्डाणपूल पार केल्यानंतर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. दरम्यान कारचा वेग जास्त असल्यामुळे कारने रस्त्यावरील दुभाजकाला धडक दिली. दुभाजकासह कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कार मधील प्रवाशांना इजा झाल्याची माहिती समजू शकली नाही. परंतु घटना घडल्यानंतर कार चालकाने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु कार चालक अथवा संबंधित कोणीही नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.