Wakad : केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने तीन विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव; वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने शाळा प्रशासनाने दहावीच्या तीन विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही. या बातमीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना शाळा प्रशासनाने धक्काबुक्की केली. हा प्रकार आज, बुधवारी (दि. 26) सकाळी अक्षरा इंटरनॅशनल स्कूल वाकड येथे घडला.

दहावीची (सीबीएसई) परीक्षा सुरू आहे. बुधवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. पेपरच्या वेळेत तीन विद्यार्थी पोहोचू शकले नाहीत. वेळेत न आल्यामुळे शाळा प्रशासनाने तीन विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील दोन पत्रकार शाळेमध्ये गेले. झालेल्या घटनेबाबत शाळा प्रशासनाने बाजू मांडण्यासाठी नकार दिला.

त्यानंतर पत्रकार शाळेच्या बाहेर आले. दुपारी दीड वाजता पेपर सुटला. विद्यार्थी परीक्षा हॉलमधून बाहेर येत असताना शाळेच्या बाहेरून पत्रकार व्हिडिओ घेत होते. त्यावेळी शाळेचे कर्मचारी आले आणि त्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत व्हिडिओ काढण्यासाठी मज्जाव केला.

परीक्षेस बसू न दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही.

HB_POST_END_FTR-A2
You might also like