Delhi News : कोविड -19 च्या व्यवस्थापनासाठी आयुर्वेद आणि योगावर आधारित नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल जाहीर

एमपीसी न्यूज – केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोविड -19 च्या व्यवस्थापनासाठी आयुर्वेद आणि योगावर आधारित नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परिषदेत जाहीर केले आहे.

या परिषदेत आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद येसो नाईक, नीती आयोग उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि नीती आयोग सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल हे देखील सामील झाले होते.

आयसीएमआरचे माजी महासंचालक डॉ. व्ही.एम. कटोच यांच्या अध्यक्षतेखाली, ‘नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल: कोविड -19’ मध्ये आयुर्वेद आणि योगा यांचा समावेश यासंदर्भातील समितीने अहवाल तयार केला आणि स्वीकार्य प्रायोगिक आणि क्लिनिकल डेटावर आधारित शिफारस सादर केल्या.

हे निष्कर्ष, औषधांचे संभाव्य फायदे आणि सुरक्षितता दर्शविणारे असून कोविड 19 वरील राष्ट्रीय कृती दल आणि संयुक्त देखरेख समूहासमोर सादर केले गेले आणि त्यानंतर नीती आयोगाच्या शिफारशींनुसार प्रोटोकॉलमध्ये विकसित केले गेले.

_MPC_DIR_MPU_II

आयुष मंत्रालयामार्फत लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासंदर्भातील मार्गदर्शन आतापर्यंत लोकप्रिय झाल्याबद्दल मंत्रालयाचे कौतुक करीत डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड -19 महामारीच्या काळात योग्य व्यवस्थापनासाठी आयुष मंत्रालयासोबत सल्लामसलत करण्यावर भर दिला आहे.

प्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भातील हे प्रोटोकॉल केवळ कोविड व्यवस्थापनातच नाही तर आधुनिक काळात समस्यांचे निराकरण करण्यासाठी पारंपारिक ज्ञान सुसंगत बनवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण पाऊल आहे”. गुडुची, अश्वगंधा, आयुष-64 यासारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या आयुर्वेदिक वनौषधींचा कोविडवरील उपचारांमध्ये समावेश केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. “दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर आयुर्वेदाकडे फारसे लक्ष गेले नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच्या महत्त्वावर भर दिला ” असे ते पुढे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.