Talegaon Dabhade : तळेगाव रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा लोहमार्गावर असलेल्या तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी जागरुक वाचक कट्टाचे उपाध्यक्ष दिलीप डोळस आणि सहसचिव अमित प्रभावळकर यांनी तळेगाव रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडे केली आहे.

जागरुक वाचक कट्टाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे हे पश्चिम रेल्वेच्या पुणे मुंबई दरम्यानचे एक महत्वाचे स्टेशन आहे. या स्टेशनवर एक्सप्रेस आणि लोकल अशा दोन्ही प्रकारच्या गाड्या थांबतात. दररोज हजारो प्रवासी या स्टेशन वरून ये-जा करत असतात. सध्या कोरोनामुळे थोडीशी रहदारी कमी असली तरी हळूहळू सर्व बाबी सुरू होणार आहेत. प्रवाशांची संख्या देखील वाढणार आहे. असे असूनही या स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.

अनेक वेळा एकट्या महिला आणि इतर प्रवासी प्रवास करत असतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांच्या जानमालाच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत गरजेचे आहे. तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन आणि परिसरात सीसीटीव्ही बसवावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.