Maval News : मावळातील कामगारांच्या पगारवाढीसाठी प्रयत्न करणार – देवा गायकवाड

एमपीसी न्यूज –  मावळ मधील तरुणांच्या पगारवाढीसाठी प्रयत्न करणार व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार असं आश्वासन आंदर मावळमधील देवा गायकवाड यांनी नुकतंच kinetic कंपनी येथे कामगारांना दिले. टाकवे येथील Kinetic कंपनीच्या गेटवर होणाऱ्या आंदोलनदरम्यान गायकवाड बोलत होते. 

कान्हे मावळ येथील आद्योगिक क्षेत्रात असंख्य आद्योगिक कारखाने आहेत व मावळ मधील बहुतांश कामगारवर्ग त्यावर अवलंबून आहे. कोरोना काळानंतरवाढलेल्या महागाईने अक्षरशः सर्वसामन्यांचं कंबरडं मोडलं आहे, तुलनेत मुबलक पगार नसल्याने कामगारवर्गाला घरखर्चासाठी कसरत करावी लागते.

याच पार्श्वभूमीवर टाकवे येथील Kinetic कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीसाठी गेटवर आंदोलन चालू होते. दरम्यान आंदोलन सुरू असतानाच गायकवाड यांनी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांच्या तक्रारी जाणुन घेतल्या आणि पगारवाढीसाठी जे काही प्रयत्न करता येईल ते करू व कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही दिली.

दरम्यान, कंपनीतील अधिकाऱ्यांसोबत कामगारांच्या पगारवाढीबद्दल सकारात्मक चर्चा झाली असं त्यांनी कामगारांना आश्वासित केलं. येत्या पुढील काळात योग्य ती पगारवाढ करुन कामगारांच्या भवितव्यासाठी आवश्यक सुविधा देऊ अशीही ग्वाही संबंधित कंपनीतील व्यवस्थापनाने दिली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

देवा गायकवाड यांनी कामगारांसाठी उचललेल्या पवित्र्याचे पडसाद राजकीय भवितव्यासाठी फायदेशीर ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसली.

याप्रसंगी शिवाजी असवले, भुषण असवले, अंकुश कचरे, शिवाजी शिंदे, सोमनाथ चोरघे, योगेश चोरघे, नितीन कुटे व सर्व कामगार उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.