Dighi : दुकानाचा पत्रा उचकटून एक लाखांचा इलेक्ट्रॉनिक्स माल लंपास

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानातून 1 लाख 17 हजार रुपयांचा इलेक्ट्रॉनिक्स माल चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 9) सकाळी दहाच्या सुमारास च-होली येथे उघडकीस आली.

प्रितेश पोपट शिवले (वय 29, रा. आझादनगर, च-होली बुद्रुक) यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रितेश यांचे च-होली येथे आझादनगरमध्ये सुखकर्ता इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दुकान आहे. मंगळवारी (दि. 8) रात्री दहा वाजता प्रितेश यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून टीव्ही, मोबाईल फोन, हेडफोन असा एकूण 1 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रितेश यांनी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.