Dighi Crime News : चार हजारांची लाच घेताना सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – आरोपीला मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना एका सहायक फौजदारास रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. 15) दिघी पोलीस ठाण्यात ही कारवाई केली आहे. 

निवृत्ती चव्हाण असे या प्रकरणातील आरोपी सहायक फौजदाराचे नाव आहे. चव्हाण हे दिघी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत.

तक्रारदार यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली.

त्यानुसार, गुरुवारी लाचलुचपत विभागान चव्हाण यांना तडजोडीअंती 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.