Dighi Crime News : राडा करणाऱ्यांना जाब विचारणाऱ्यास मारहाण; कारची तोडफोड

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये घुसून आरडाओरडा करत राडा करणा-यांना जाब विचारणा-यास आठ जणांनी मारहाण केली. त्यानंतर कोयता, सळईने कारची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. 9) रात्री साडेदहा वाजता वडमुखवाडी, च-होली येथे रानजत्रा हॉटेलमध्ये घडली.

जयेश काळजे, शेखर शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही) आणि त्यांच्या सहा साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सचिन चंद्रकांत सातव (वय 31, रा. वाघोली, ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सातव आणि त्यांचे सहकारी वडमुखवाडी येथील रानजत्रा हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री जेवण करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून आरडाओरडा करत रिकामी बाटली फेकली. त्याचा जाब फिर्यादी सातव यांनी विचारला असता आरोपी जयेश आणि शेखर यांनी सातव यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी कोयता, सळई आणि लाकडी दांडक्याने सातव यांची इनोव्हा कारची तोडफोड केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.