Dighi Crime News : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून केली प्रेमाची मागणी; तरुणावर गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – तरुणाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून प्रेमाची व लग्नाची मागणी केली. मुलीने यासाठी नकार दिला असता तिला मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या आईला देखील बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते 9 जून 2021 या कालावधीत देहूफाटा येथे घडला.

दत्ता गोरखे वय (20, रा. देहूफाटा, आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा सप्टेंबर 2020 पासून पाठलाग केला. तसेच तिच्याकडे प्रेमाची व लग्नाची मागणी केली. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीला समजावून सांगितले असता आरोपीने फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली. तसेच पीडित मुलीने आरोपीला प्रेमासाठी नकार दिला असता तिला देखील मारण्याची धमकी दिली.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment