Dighi crime News : पत्नी व मुलाला मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरगुती कारणांवरून वाद झाल्याने वेगळे राहत असलेल्या पत्नी व मुलाला पतीने मारहाण केली. याबाबत पत्नीने पोलिसात धाव घेत पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 27 सप्टेंबर रोजी सकाळी दिघी येथे घडली.

जितेंद्र चंदनमल फिरोदिया (वय 44, रा. दिघी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी ललिता जितेंद्र फिरोदिया (वय 42, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललिता आणि जितेंद्र पती-पत्नी आहेत. त्यांचे घरगुती कारणांवरून भांडण होत होते. त्यामुळे ते दोघेही मागील पाच ते सहा महिन्यांपासून एकाच इमारतीमध्ये वेगवेगळे राहत आहेत. 27 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता फिर्यादी ललिता पाणी भरण्यासाठी तळ मजल्यावर गेल्या होत्या.

त्यावेळी आरोपी जितेंद्र याने त्यांना स्टीलच्या रॉडने मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आई-वडिलांचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या मुलाला देखील जितेंद्र याने हाताने मारहाण केली.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.