Dighi Crime News : बस स्टॉपवर थांबलेल्या पीएमपीला पाठीमागून दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बस स्टॉपवर थांबलेल्या पीएमपी बसला एका दुचाकीने पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 25 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता आळंदी-मोशी रोडवर घडली.

_MPC_DIR_MPU_II

पोलीस नाईक प्रकाश कोंढावळे यांनी याबाबत 26 डिसेंबर रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक रघुनाथ पाठक (वय 40, रा. गोपाळपुरा, आळंदी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दुचाकीस्वार अशोक पाठक हे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता आळंदीकडून मोशीकडे जात होते. त्यांच्या समोरुन पीएमपी बस जात होती. बस रोडच्या कडेला बस स्टॉपवर थांबली असता अशोक पाठक यांनी बसला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये अशोक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत एक महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.