Dighi : खंडणी दिली नाही म्हणून दुकानांसह वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – खंडणी दिली नाही म्हणून दोन दुकानांची आणि दुकानासमोरील वाहनांची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी तीनच्या सुमारास दिघी रोड भोसरी येथे घडली.

आझमआलम मोहमंदआलम शेख (वय 30, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार वैभव सुरेश माने (वय 22, रा. दत्तनगर, चिंचवड), अनिकेत राजेंद्र महाबरे (वय 18), कुणाल लिडकर, किरण राठोड (तिघे रा. भोसरी) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हे त्यांच्या कामगारासह दुकानात काम करत असताना आरोपी तेथे आले आणि त्यांनी शेख यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी शेख यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपींनी चिडून शेख यांच्या दुकानाची तोडफोड करत त्यांना कोयत्याने मारहाण केली.

दुकानाच्या गल्ल्यातील 3 हजार 500 रुपये घेतले तसेच जवळच असणाऱ्या आरीफ शेख यांच्याही दुकानाची तोडफोड करीत दुकानासमोरील वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.