Pimpri : अभिनय कार्यशाळेचे उद्या निगडीमध्ये आयोजन

एमपीसी न्यूज – अमित गोरखे युथ फाऊंडेशन, कलारंग कलासंस्था आणि प्राईड फिल्म टेलिव्हिजन इन्स्टियूट यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे एक दिवसीय अभिनय कार्यशाळा आयोजित केली आहे.

  • निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुल येथे नॉव्हेल इन्स्टिटयूटमध्ये शनिवार (दि. ९) फेब्रुवारीला दुपारी चार वाजता ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेमध्ये अभिनय दिग्दर्शन, निवेदन, फिल्म मेकिंगल, स्किन प्रिटिंग, व्हॉईस ओव्हर, डबिंग याबाबतीत योग्य ते मोफत मार्गदर्शन कऱण्यात येणार आहे.

या शिबिराचे उदघाटन प्रसिध्द अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील, निवेदक भाऊसाहेब कोकाटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अमित गोरखे युथ फाऊंडेशनचे संस्थापक अमित गोरखे उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यशाळेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी (7350950306) या नंबरवर करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.