Dighi News: दिघी, आळंदी येथील शासकीय वसतिगृहातून दोन मुले बेपत्ता

एमपीसी न्यूज – दिघी आणि आळंदी येथील शासकीय वसतिगृहातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. याप्रकरणी दिघी आणि आळंदी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

दिघी येथे ज्ञानदीप बालगृह हे वसतिगृह आहे. त्यात शालेय विद्यार्थी राहत आहेत. नुकत्याच शाळा आणि वसतिगृह सुरु करण्यात आली आहेत. सोमवारी (दि. 20) सकाळी दहा वाजताच्या सुमारास वसतिगृहातून 16 वर्षांचा एक मुलगा बेपत्ता झाला. वसतिगृह प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा येथील समाजकल्याण विभागाच्या आदेशाने आळंदी येथील अन्नपूर्णानगर येथे असलेल्या बालकाश्रमात मुलांचे संगोपन केले जाते. दहावीपर्यंतच्या मुलांचे काळजी आणि संरक्षण या बालकाश्रम घेतले जाते. या बालकाश्रमातील विद्यार्थी सोमवारी सकाळी उठले असता त्यांना त्यांच्यासोबत राहणारा एक 10 वर्षांचा मुलगा दिसला नाही.

मुलांनी तात्काळ वसतिगृह प्रशासनाला माहिती दिली. वसतिगृह प्रशासनाने बेपत्ता झालेल्या मुलाचा परिसरात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे शोध घेतला. मात्र त्याचा शोध न लागल्याने याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.