Tribute to Lata Mangeshkar : संगीताचा भावस्पर्शी स्वर हरपला – दिलीप वळसे पाटील

एमपीसी न्यूज – आपले स्वरमाधुर्य आणि गानप्रतिभेने संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन अत्यंत वेदनानदायी आहे. भारतीय संगीताचा भावस्पर्शी स्वर आज हरपला आहे. अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

लतादीदींच्या तजेलदार, भावमयी आवाजाच्या आनंदघनामध्ये रसिकांच्या पिढ्यानपिढ्या सुरात न्हाऊन निघाल्या आणि यापुढेही हा सूर भारतीय संगीतात अढळ राहील. गानसरस्वती लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज (रविवारी, दि. 6) मुंबई येथे एका रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर मागील 28 दिवसांपासून उपचार सुरु होते. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. अनेक दशके त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.