Nigdi Crime News : गजानन चिंचवडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा नऊ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चिंचवडगाव मधील भाजपाचे नेते गजानन चिंचवडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गजानन चिंचवडे यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिंचवडे (वय 45) यांनी शनिवारी (दि. 5) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शकुंतला बाळू चिंचवडे, दिनेश बाळू चिंचवडे, राजेश बाळू चिंचवडे, महेश उर्फ सुनील बाळू चिंचवडे, ओंकार महेश चिंचवडे, संकेत दिनेश चिंचवडे, तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे चिंचवडगाव मधील नेते गजानन चिंचवडे यांचा शनिवारी (दि. 5) दुपारी एक वाजताच्या पूर्वी मृत्यू झाला. आरोपींनी गजानन चिंचवडे यांच्या विरोधात 25 जानेवारी रोजी फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल केला. त्याची न्यूज पेपर, न्यूज चॅनलला बातमी देऊन चिंचवडे यांची बदनामी करत त्यांना मानसिक त्रास दिला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 306, 34 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोरडे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.