Pimpri News : स्थायी समिती बरखास्त करा, टक्केवारी नही चलेगी; राष्ट्रवादीचा महापालिकेवर मोर्चा

एमपीसी न्यूज – स्थायी समितीतील लाचखोरी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत पिंपरी चौकात जागरण गोंधळ आंदोलन करत महापालिकेवर मोर्चा काढण्यात येत आहे. “स्थायी समिती बरखास्त करा”, “नही चलेगी, नही चलेगी, टक्केवारी नही चलेगी” अशा जोरदार घोषणा देत महापालिकेवर मोर्चा काढला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जागरण गोंधळ आंदोलन  केले. पोतदार, नंदीबैल, वासुदेव, गोंधळी  सहभागी झाले होते. त्यानंतर महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, महिला आघाडी शहराध्यक्ष वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, प्रवक्ते फझल शेख, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एसीबीच्या कारवाईनंतर आज (बुधवारी) महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज आंदोलने करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.