Chinchwad News : बिजलीनगर मध्ये सव्वा लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज – बिजलीनगर मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना 17 जुलै रोजी रात्री उघडकीस आली. याबाबत 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवन तुकाराम ढवाण (वय 36, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचा गॅलरी कडील बेडरूमचा दरवाजा कडीकोयंडा तोडून उघडला. बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातून एक लाख 20 हजार 455 रुपये किमतीचे 32.70 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.