Lonavala : सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त खेळाडूंना फळे वाटप

एमपीसी न्यूज – आखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यातील रेल्वे क्रीडांगणावर खेळाडूंना फळे वाटप करण्यात आली.

पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व नगरसेवक निखिल कविश्वर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेवक सुधीर शिर्के, सुर्वणा अकोलकर, जितेंद्र टेलर, बाबुभाई शेख, नितेश कवडे, मंगेश बालगुडे, अमित शेडगे, अमित बारसे, अमोल चौधरी, बाळासाहेब औरंगे, संजय गवळी, गणेश रगडे, संजय तळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेवक निखिल कविश्वर म्हणाले रेल्वे क्रीडांगणावर क्रिकेटची चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु आहे. याठिकाणाहून अनेक चांगले खेळाडू महाराष्ट्राला व देशाला मिळाले आहेत. या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता आज या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.