Bhosari : भोसरी, सांगवी परिसरातून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भोसरी, एमआयडीसी आणि सांगवी परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 8) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुनील रामराव पनबोने (वय 38, रा. भारत माता नगर, दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 4 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेएक ते 5 ऑक्टोबर पहाटे साडेबाराच्या सुमारास सुनील यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची एम एच 14 / बी ई 2503 ही दुचाकी भोसरी मधील उड्डाणपुलाखाली शिवाजी पुतळ्यासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

मालाजी सर्जेराव निंबाळकर (वय 54, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाजी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 30 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ ते 1 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या कालावधीत माळाजी यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची एम ए टी घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी एम ए टी चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

सुनील बबन हातोडे (वय 52, रा. कुंभार वाडा, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. 7) रात्री साडेआठच्या सुमारास सुनील यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एफ के 4000 ही बुलेट दुचाकी कुंभार वाडा येथील श्रीकृष्ण मंदिराच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी लॉक ताडून चोरून नेली. ही घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.