Maval News : आदिम कातकरी सेवा अभियानांतर्गत कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप

आमदार सुनील शेळके यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – आमदार सुनिल शेळके यांनी ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबवून सहकाऱ्यांच्या मदतीने तालुक्यातील सर्व कातकरी बांधवांच्या घरोघरी जाऊन जातीच्या दाखल्यांचे अर्ज भरून घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. बुधवारी (दि. 6) परंदवडी, उर्से, पिंपळखुंटे व बेबेडओहोळ येथील कातकरी बांधवांना आमदार शेळके यांच्या सहकाऱ्यांनी घरोघरी व कामाच्या ठिकाणी जाऊन जातीच्या दाखल्यांचे वाटप केले आहे. ग्रामीण भागातील कातकरी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीच्या दाखल्यांची मदत होणार आहे.

यावेळी सरपंच भारती गावडे, ग्रामपंचायत सदस्य जयश्री राजाराम सावंत, आश्विनी सुधीर बराटे, सतीश कारके, ग्रामसेवक बाळासाहेब गावडे, सुधीर बराटे, युवराज ठाकूर, सदुकर सावंत, सेवक घारे, संदीप ढमाले, रणजित घारे, पवनसिंह घारे, अविनाश गराडे, नबिलाल आत्तार, रुपेश सोनुने आदि उपस्थित होते.

कातकरी कुटुंबीयांना घरपोच जातीचे दाखले मिळाल्याने कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले आहेत. कातकरी बांधवांना आदिम कातकरी सेवा अभियानांतर्गत कोणत्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे न मारता त्यांना दाखले उपलब्ध झाल्याने त्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचले असून या दाखल्यांमुळे त्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा व सवलतींचा लाभ घेता येणार आहे.

मावळातील कातकरी बांधवांसाठी राबवित असलेल्या आदिम कातकरी सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे कातकरी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे कार्य आमदार सुनिल शेळके यांच्याकडून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.