Maval : क्रांतिदिनानिमित्त गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथे विविध वस्तूंचे वाटप 

एमपीसी न्यूज – क्रांतीदिनाचे औचित्य साधून येथील युवा उद्योजक रोहीत गिरमे यांनी येथील विश्व हिंदु परिषद संचालित गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथे विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

युवा उद्योजक रोहित सुदेश गिरमे यांच्या तर्फे वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ही मदत करण्यात आली. त्यात धान्य, डाळी, तेल , खाऊ, शालेय वस्तू आदीचे वाटप करण्यात आले. यावेळी मावळ तालुका समता परिषदेच्या महिलाध्यक्षा स्नेहलता बाळसराफ, उद्योजक गणेश भेगडे, बाळासाहेब बोरावके, योगेश माळी, समीर घुमटकर, माजी सरपंच स्वप्नील भुजबळ, व्यवस्थापक सोमनाथ वैद्य, प्रतीक गिरमे आदीसंह सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. यावेळी, स्नेहलता बाळसराफ, गणेश भेगडे, बाळासाहेब बोरावके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.