Pimpri : दिवाळी सणानिमित्त… बाहेरगावाहून आलेल्या एसटी चालक-वाहकांना फराळाचे वाटप..!

एमपीसी न्यूज – दिवाळी सणांमध्ये आपल्या घरापासून नोकरीनिमित्त दूर राहून प्रवाशांची अखंड सेवा करणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांना मायेची ऊब देणारा “दिवाळी फराळ” वाटपाचा उपक्रम गेली ६ वर्षे एसटीच्या पिंपरी-चिंचवड वल्लभनगर आगारात राबविला जात आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी बाहेरगावावरून बसेस घेऊन आलेल्या चालक-वाहकांना अतिशय स्नेह भावनेने फराळ वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.

पिंपरी-चिंचवड वल्लभनगर आगार येथील वाहक- चालकांना दिवाळीनिमित्त सुगंधी उटणे, फराळ यांचे वाटप करण्यात आले. सालाबाद प्रमाणे यंदाही आगार व्यवस्थापक एस.एन. भोसले यांच्या हस्ते कर्तव्यावर असलेल्या बाहेरगावाहून कामगीरी निमित्त आलेल्या चालक-वाहकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. सणासुदीला कुटुंबापासून दूर नोकरीनिमित्त काम करणाऱ्या चालक-वाहकांना सण व उत्सवाची उणीव भासू नये म्हणून गेली ६ वर्षे नित्य नेमाने फराळ वाटपाचा हा उपक्रम राबविला जातो या उपक्रमातून एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये स्नेह भावाची भावना वाढीस लागते एकत्र काम करत असताना सहकारी कर्मचाऱ्यांच्या प्रेरणा बनवून त्याला प्रोत्साहित करण्याची सुवर्ण संधी या निमित्ताने साधली जाते.

एसटी प्रशासन सांघिक कामगिरीच्या जोरावर उत्पन्न वाढविण्यासाठी सदैव प्रयत्न करते. या पुढे सुध्दा उत्पन्न वाढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन आगार व्यवस्थापक एस.एन. भोसले यांनी या वेळी केले. तसेच प्रवासी सेवेचा आनंद एसटी कर्मचाऱ्यांनी घेत असतानाच , सर्वसामान्य जनतेची दिवाळी उत्साहात व आनंदी वातावरणात साजरी होण्यासाठी त्यांना एसटीच्या सुरक्षित व सुखकर प्रवासाची हमी द्यावी. अशी भावनाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी स्थानक प्रमुख पल्लवी पाटील, सहाय्यक वाहतुक निरिक्षक एम.आर. जगताप वाहतुक नियंत्रक आर.टी. जाधव व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.