Domestic violence : घरगुती कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीवर गुन्हा

एमपीसी न्यूज : शारीरिक व मानसिक छळ करून क्रूर वागणूक देत सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला.(Domestic violence) हा प्रकार सन 2009 पासून 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत मोशी येथे घडला.

याप्रकरणी 37 वर्षीय पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती मयूर भाऊसाहेब लंकेश्वर (वय 38, रा. बाणेर), सासू (वय 60), सासरे भाऊसाहेब भगवान लंकेश्वर (वय 65), नणंद (वय 41) तिघे रा. विजापूर रोड, सोलापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Corona Update : शहरात आज 36 नवीन रुग्णांची नोंद; 74 जणांना डिस्चार्ज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस वेळोवेळी टोमणे मारून किरकोळ कारणावरून त्रास दिला. विवाहितेला शिवीगाळ, मारहाण केली.(Domastic Violence) धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ करत क्रूर वागणूक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.