MNS : क्रिकेटचे स्टेडियम, पालिकेची इमारत नको, दररोज पाणी द्या; मनसेची मागणी

एमपीसी न्यूज – क्रिकेट स्टेडियम उभारण्यास आमचा विरोध आहे. शहरवासीयांना नव्याने क्रिकेटचे स्टेडियम नको, नव्याने होत असलेली महानगरपालिकेची इमारत पण नको आहे. त्याऐवजी शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मनसेने (MNS) आंदोलन केले.

Maharashtra News : अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – दीपक केसरकर

याबाबत मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरामधील अण्णासाहेब मगर स्टेडियम अनेक दिवसापासून धूळ खात पडलेले आहे. काम रखडलेल्या अवस्थेत आहे. शहरातील अनेक क्रीडांगणांची दुरावस्था झालेली आहे.

याकडे महापालिकेचे कोणतेही लक्ष नाही. खर्च करून सुद्धा सर्व क्रीडांगणाची अवस्था खराब आहे. सर्व क्रीडांगणाचे खासगीकरण करण्याचा प्रशासन घाट घालत होते. हे सर्व असताना नव्याने एवढा मोठा खर्च करून क्रिकेट स्टेडियम कशाला? , प्रथमता शहरातील सर्व क्रीडांगणे व्यवस्थित व चांगल्या दर्जाची करून शहरातील सर्व क्रीडापटूंना वापरण्याजोगी करून देण्यात यावी. अण्णा साहेब मगर स्टेडियमचे डेव्हलपमेंट करावे.

नव्याने महानगरपालिकेची इमारत बांधण्यासाठी सुद्धा मोठा निधी वापरण्यात येणार आहे. सध्या स्थितीला नागरिकांची व शहरवासीयांची ही गरज नाही. मागील तीन वर्षांपासून शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा प्रशासन करत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना, महिला वर्गांना त्रास सहन करावा लागत आहे.

काही ठिकाणी जास्त प्रेशर ने पाणीपुरवठा होतो, तर काही ठिकाणी खूप कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही सोसायटीमध्ये आजही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तरी नागरिकांची गरज लक्षात घेता पाणीपुरवठा विभागास निधी उपलब्ध करून द्यावा.

प्रशासनाने बंद पडलेली पवना जलवाहिनी लक्ष देऊन चालू करावी. शहरवासीयांना रोज पाणीपुरवठा होईल अशी व्यवस्था प्रशासनाने करावी.

या आंदोलनात सचिन चिखले, अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, बाळा दानवले, राजू सावळे, दत्ता देवतरासे रुपेश पटेकर, विशाल मानकरी , नितीन चव्हाण, प्रतीक शिंदे, आकाश सागरे देवेंद्र निकम नारायण पठारे शिरीष महाबळेश्वर, विशाल साळुंके, काशिनाथ खजुरकर, सत्यम पत्रे, अलेक्स आप्पा मोझेस, जयसिग भाट, मयूर चिंचवडे , प्रतीक वाळुंज, अक्षय कदम, प्रफुल्ल गोपनारायण, सचिन मिरपगार, सुरेश सकट, शिवकुमार बायस, श्रावण ठाकूर , विपुल काळभोर , सोमनाथ काळभोर , जय सकट , प्रदिप घोडके व पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.