Pune : लॉयला, बिशप्स प्रशालेकडून गोलांचा पाऊस

एमपीसी न्यूज : टाटा ऑटोकॉम्प पुरस्कृत आंतरशालेय लॉयला (Pune) करंडक फुटबॉल स्पर्धेत आज शहरात बरसणाऱ्या संततधार पावसाबरोबर मैदानातही गोलांचा पाऊस पडला. बिशप्स आणि लॉयला प्रशाला संघांनी निर्विवाद वर्चस्व राखताना सहा सामन्यात मिळून 46 गोल केले. यात 36 गोल एकट्या बिशप्स प्रशालेने नोंदवले. 

लॉयला प्रशालेने विद्याभवन प्रशालेविरुद्ध 12 वर्षांखालील गटात 4-0, 13 वर्षांखालील गटात 3-0 आणि 16 वर्षांखालील गटात 1-0 असा विजय मिळविला.

लॉयलाच्या 12 वर्षांखालील गटात अनुराग पारसनीसने दोन, आरव वागळे, शॉन आंग्रेने प्रत्येकी एक गोल केला. 14 वर्षांखालील गटात अन्य दम्बाल, पार्थ शिंदे आणि परम कुलकर्णीने एकेक गोल केला. 16 वर्षांखालील गटात एकमात्र गोल लव्या अशराणीने केला.

MNS : क्रिकेटचे स्टेडियम, पालिकेची इमारत नको, दररोज पाणी द्या; मनसेची मागणी

दुपारच्या सत्रात लॉयला प्रशालेच्या मैदानावर गोलांचा पाऊस पडला. शिखर शहाच्या (11, 13, 16, 19, 21, 28, 30 वे मिनिट) सात गोलच्या जोरावर बिशप्स प्रशाला संघाने 14 वर्षांखालील गटात सेंट पेट्रिक्स प्रशालेचा 15-0 असा पराभव केला.

अर्जून देशपांडेने चार, दिव्यान कौशिकने तीन (Pune) आणि क्रिस मेण्डोकाने एक गोल करून संघाच्या गोलाधिक्यात भर घातली.

 

बिशप्सने 16 वर्षांखालील गटात सेंट पेट्रिक्स प्रशालेचाच 7-0 असा पराभव केला. श्रावण कुडके, राज पाटिल, हल्लम हार्ट, आथर्व फडतरे, आरिझ शेख यांनी एकेक, तर आरव सिधवानीने दोन गोल केले.

 

दिवसातल्या अखेरच्या सामन्यात 12 वर्षांखालील गहटात बिशप्स प्रशाला संघाने सेंट पेंट्रिक्सवर 14-0 असा विजय मिळविला.  यामध्ये ध्रुव चुगानीने पाच, तर ध्रुव बाडकरने तीन गोल केले. अबीर जाधव, झिदान अक्कलकोटकरने दोन, हितांश खत्री, अर्सलान शेखने एकेक गोल केला.

निकाल –

12 वर्षांखालील – लॉयला प्रशाला 4 (आरव वागळे 5वे मिनिट,  अनुराग पारसनीस 6, 14वे मिनिट, शॉन आंग्रे 34वे मिनिट) वि.वि. विद्याभवन प्रशाला 0

 

बिशप्स प्रशाला कॅम्प, 14 (ध्रुव चुगानी 2, 5, 8, 9, 11वे मिनिट, हितांश खत्री 13 वे मिनिट, झिदान अक्कलकोटकर 15, 28वे मिनिट, अबीर जाधव 16, 40 वे मिनिट, ध्रुव बाडकर 23, 33, 39 मिनिट, अर्सलन शेख 38 वे मिनिट) वि.वि. सेंट पेट्रिक्स प्रशाला 0

 

14 वर्षांखालील लॉयला प्रशाला 3 (अन्वय दम्बल 3रे मिनिट, पार्थ शिंदे 31वे मिनिट, परम कुलकर्णी 41वे मिनिट) वि.वि. विद्याभवन प्रशाला 0

 

बिशप्स प्रशाला, कॅम्प 15 (अर्जुन देशपांडे 1, 8, 27, 36 वे मिनिट, शिखर शहा 11, 13, 16, 19, 21, 28, 30 वे मिनिट, दिव्यन कौशिक 24, 25, 35 वे मिनिट, क्रिस मेंण्डोका 34वे मिनिट) वि.वि. सेंट पेट्रिक्स प्रशाला 0

 

16 वर्षांखालील – लॉयला प्रशाला 1 (लव्या अशराणी 34वे मिनिट) वि.वि. विद्याभवन 0

 

16 वर्षांखालील – बिशप्स प्रशाला, कॅम्प 7 (श्रावण कु़डके 5वे मिनिट, राज पाटिल 6वे मिनिट, हल्लम हार्ट 29वे मिनिट, अथर्व फडतरे 30 वे मिनिट, आरिझ शेख 48वे मिनिट, आरव सिधवानी 50, 60वे मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.