Pune News : मुंबईनंतर आता पुण्यात ‘डबल डेकर’ बस धावण्याचा मार्ग मोकळा

एमपीसी न्यूज : पुण्यातही आता डबल डेकरबस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणेकरांच्या सार्वजनिक वाहन व्यवस्थेत डबल डेकरबसचा सामावेश होणार आहे. (Pune News) गुरुवारी झालेल्या पीएमपीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यानुसार पहिल्या टप्प्यात 20 इलेक्ट्रीक डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून डबल डेकर बस सुरु करण्यावर चर्चा सुरु होती. गुरुवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या  कार्यालयात संचालक मंडळाची बैठक पार पडली. बैठकीला पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह हे ऑनलाईन उपस्थित होते. या बसेस इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित असतील. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक मदत घेण्यात आली आहे.

Chinchwad Bye-Election :  नाना काटे यांना 40 संघटनांचा पाठिंबा !

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) इलेक्ट्रिक डबल-डेकर बस खरेदी आणि चालविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे आणि या बसेस ज्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात धावतील अशा 40 मार्गांना अंतिम रुप दिले आहे. मार्ग निवडताना रस्त्यांची परिस्थिती आणि प्रवाशांचा प्रतिसाद विचारात घेण्यात आला आहे.

पीएमपीएमएलच्या आगामी बैठकीत या विषयावर चर्चा होणार असून त्यानंतर डबल डेकर बस खरेदीला गती दिली जाणार आहे. (Pune News) पीएमपीएमएलने शेअर केलेल्या माहितीनुसार, हडपसर, कात्रज आणि कर्वे रस्त्यावरील प्रवासी येत्या काही महिन्यांत डबलडेकर बसने प्रवास करु शकतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.