Chinchwad Bye-Election :  नाना काटे यांना 40 संघटनांचा पाठिंबा !

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार (Chinchwad Bye Election) नाना काटे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पुरोगामी पक्ष, 40 संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.

रहाटणीत झालेल्या पत्रकार परिषदेला  नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे यांच्यासह नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, कामगार संघटनेचे डॉ. सुरेश बेरी यांच्यासह धनाजी येळकर पाटील, सचिन आल्हाट, सतीश काळे, गणेश दराडे, प्रकाश जाधव, अमीन शेख, अपर्णा दराडे, युवराज बाळासाहेब पवार, अशोक मिरगे, कॉ माधव रोहम, प्रल्हाद कांबळे, अरविंद जक्का, शैलेश गाडे, लता भिसे, शिवशंकर उबाळे, विशाल कसबे, सचिन भाऊ सकाटे, हरिभाऊ वाघमारे, अभिजीत भालेराव, चेतन वाघमारे, शांताराम खुडे, सचिन बगाडे, गिरीश साबळे, बाबासाहेब चव्हाण, प्रदिप पवार, राजेश माने, आशिष शिंदे, लालासाहेब गायकवाड, दिलीप काकडे, डॉ, कॉ . बी.टी . देशमुख, सिद्धेश्वर, तानाजी हराळे, चंद्रकांत क्षीरसागर, अनंत व्हंडरने, नकुल भोईर, संतोष वाघे उपस्थित होते.

Chinchwad Bye-Election : आचारसंहिता कक्षाकडून 4 हजार पोस्टर, बॅनर्सवर कारवाई

मानव कांबळे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शेतकऱ्यांना कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंविधानिक मार्गाने व अनैतिक पद्धतीने (Chinchwad Bye Election) नाना काटे यांना 40 संघटनांचा पाठिंबा ! आठ महिन्यापूर्वी शिंदे सरकार स्थापन केले. भारतीय जनता पक्षाचे व शिंदे गटाचे नेते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील अशा महापुरुषांचा अवमान वक्तव्य करतात. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांचा अवमान केला त्यांना पाठीशी घालण्याचे काम शिंदे आणि फडणवीस सरकार करत आहे.

धनाजी येळेकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर आहे. मागील पाच वर्षांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र या काळात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यानिशी समोर आले. 24 तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देऊनही गेल्या तीन-चार वर्षांपासून शहरांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था, पूर्वीपेक्षा अधिक वाहतूक कोंडी, कचऱ्याचे ढीग, अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरून लोकांची फसवणूक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.