Nigdi: पावणे दोन लाखांचे सोन्याचे दागिने असलेली महिलेची पर्स हिसकावली

एमपीसी न्यूज – घरी जाणा-या पादचारी महिलेच्या हातातील पर्स दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरूवारी दुपारी साडेचारच्या सुमारास निगडीत ल गोकूळ स्विट मार्ट समोर घडली.

नंदा बबन साबळे (वय-49, रा. पेठ क्रमांक 27, प्राधिकर) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी राजु खेमु राठोडगे (वय-34) व शंकर ऊर्फ शिवा रामदास बिराजदार (वय-34) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गुरूवारी दुपारी साडेचारच्या सुमारास निगडीतील गोकूळ स्विट मार्ट समोरून पायी घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील आरोपींनी फिर्यादी यांच्या हातातील 1 लाख 77 हजार 500 रूपयांचे सोन्याचे दागिने असलेली पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली. फौजदार व्ही. एस. वल्टे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.