BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : प्रवासी घेण्याच्या कारणावरून बस चालकांची हाणामारी

एमपीसी न्यूज – प्रवासी घेण्याच्या कारणावरून खासगी बस चालकांमध्ये भांडण झाले. या भांडणात एका बस चालकावर शस्त्राने वार करण्यात आले. ही घटना शुक्रवारी (दि. 8) पहाटे पाचच्या सुमारास हिंजवडी ब्रीजजवळ घडली.

रमेश संभाजी जाधव (वय 40, रा. शिवराजनगर, रहाटणी) असे जखमी व्यक्‍तीचे नाव असून त्यांनी शनिवारी (दि. 9) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजू गुंजाळ, दादा खाटीक, उमेश आणि केतन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास आरोपी आणि फिर्यादी यांच्यात खासगी बसमध्ये प्रवासी घेण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. आरोपींनी रमेश यांची गचांडी पकडून लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. तसेच आरोपी राजू गुंजाळ याने धारदार शस्त्राने रमेश जाधव यांच्या डोक्‍यात वार केले. यामध्ये रमेश गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like