Mumbai : भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – भाजप सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार नाही, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे.

मागील विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरला संपलेली असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला होता. जनतेने महायुतीला कौल दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री पदाच्या वादामुळे भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला नव्हता. विधानसभेची मुदत संपल्यानंतर राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यामुळे भाजप काय निर्णय घेते. याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. महायुतीची कोंडी सुटेल अशी अपेक्षा होती.

चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापनेच्या दाव्यास नकार दिला, असे नुकतेच पत्रकार परिषदेत जाहीर केले असून यावेळी शिवसेना सोबत येत नसल्याने भाजपने सत्ता स्थापनेच्या दाव्याला नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच भाजप विरोधी पक्षात बसण्यास तयार आहे, असेही स्पष्ट केले.

त्यामुळे आता सर्वांचे लक्ष शिवसेनेच्या भूमिकेकडे लागले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन करणार काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.