Bhosari : दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बीआरटी बस थांब्याजवळ पायी चालत जात असलेल्या पादचा-याचा भरधाव वेगात आलेल्या दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ४) सकाळी पावणेनऊच्या सुमारास भोसरीतील बीआरटी बसथांब्याजवळ घडली.

बाळू ऊर्फ बाळासाहेब लांडगे (वय 56, रा. गुळवे वस्ती, भोसरी), असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. सागर बाळासाहेब लांडगे (वय 29) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात दुचाकी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑक्‍टोबर रोजी सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास बाळासाहेब लांडगे हे भोसरीतून पायी चालले होते. ते बीआरटी बस थांब्याजवळ आले असता अज्ञात दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात बाळासाहेब गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.