Pune : सतीश अक्कलकोट यांना दुर्गमहर्षी प्रमोद मांडे पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – दुर्गमहर्षींचे इतिहास संशोधन,गडकिल्ले आणि क्रांतीकारकांवरील काम हे वादाजित असल्याचे दुर्ग अभ्यासक भगवानराव चिले म्हणाले. हजारो संशोधक, अभ्यासकांचे ते प्रेरणाश्रोत आहेत. इतिहासाच्या पानावर त्यांनी त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण शैलीचा अनमोल ठसा उमटवला असल्याचे ही चिले सांगितले.

दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या प्रथम स्मृतीस्मरण दिनानिमित्त दुर्गमहर्षी प्रमोद मांडे स्मृतीविचार मंच्याच्या वतीने दिला जाणार्‍या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दुर्गांवर सखोल अभ्यास करणारे आणि पुस्तकांच्या माध्यमातून संशोधन करणारे दुर्ग अभ्यासक सतीश अक्कलकोट यांची तर पं.जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणारे अभ्यासक आणि लेखक अॅड.राज कुलकर्णी यांना “क्रांतीपाईक प्रमोद मांडे पुरस्कार” प्रदान करण्यात आला. यावेळी दुर्ग अभ्यासक भगवान चिले, पिंपरी चिंचवड शहराचे उपमहापौर सचिनदादा चिंचवडे, आनंदराव शिंदे, भारत मांडे, स्नेहल मांडे यावेळी उपस्थित होते.

सतिश अक्कलकोट यांनी सांगितले की दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या नावे दिल्या जाणार्‍या पहिला मानकरी होण्याचे भाग्य माझ्या नशिबी होते. मी स्वतःस भाग्यवान समज़तो की या महान व्यक्तीचे नाव या निमित्ताने माझ्यासोबत जोडले गेले आहे आणि भविष्यात माझ्याकडून अधिकाधिक काम होण्याकामी ते प्रेरणाश्रोत झाले आहेत.

अॅड. राज कुलकर्णी यांनी क्रांतीपाईक प्रमोद मांडे पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याबद्दल समितीचे आभार व्यक्त केले. दुर्गमहर्षींच्या सहवासात आल्यापासून माझ्या व्यक्तिमत्वात अनेक सकारात्मक बदल होत गेल्याचे सांगितले. त्यांच्यामुळे अभ्यासाच्या अनेक वाटा माझ्यापुढे मोकळ्या झाल्या असून त्यामधे मी काम करण्यास प्रवृत्त झालो असे ही सांगितले.

प्रमुख पाहुणे उपमहापौर सचिनदादा चिंचवडे यांनी दुर्गमहर्षींच्या स्मरणार्थ इथून पुढे दरवर्षी प्रत्येक दिवाळीत नागरिकांसाठी दुर्गभेटीची सहल आयोजित करण्याचा संकल्प जाहिर केला.त्याच बरोबर दुर्गमहर्षी यांचं पिंपरी चिंचवड शहरात काही वर्षे वास्तव्य राहिले असल्याने पिंपरी चिंचवड शहरात नव्याने उभे होत असलेल्या संकुलास दुर्गमहर्षींचे नाव देण्यात येणे कामी ठराव करून घेण्याचे ठोस आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रसंगी इतिहास संशोधक ब.हि.चिंचवडे, दामोदर मगदूम सर, अमर जाधवराव, सत्यशिलराजे दाभाडे, अभयराज शिरोळे, शर्मिला राजेनिंबाळकर, निलेश गावडे रवि पवार, विशाल सावंत, राहूल कराळे, राजश्री कसबे, संदिप तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते

आभार प्रदर्शन अजय जाधवराव यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी आणि निवेदक संतोष घुले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.