E-Way Traffic Jam : खोपोलीजवळ तीन अपघात; मुंबईकडे जाणारी वाहतूक पहाटे दोन तास ठप्प

एमपीसी न्यूज – पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात खोपोलीजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर एका तासात तीन वेगवेगळे अपघात घडल्याने आज (शनिवार) पहाटे चार ते सकाळी सहा दरम्यान वाहतूक ठप्प (E-Way Traffic Jam) झाली होती. या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पहिला अपघात बोरघाटात 36,300 पॉईंटला पहाटे 4.04 वा घडला. त्यात ट्रेलर एका अज्ञात वाहनाला धडकला. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही.

त्याचवेळी दुसरा अपघात 39,800 पॉईंटला घडला. या अपघातात टँकरने कंटेनरला मागून धडक दिली. सुदैवाने त्या अपघातातही कोणती जीवितहानी झाली नाही.

Todays Horoscope 18 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

तिसरा अपघात 40,200 पॉईंटला पहाटे 5.04 वा घडला. आयशर टेम्पो एका अज्ञात वाहनस धडकल्याने एकाच मृत्यू झाला आहे.

खोपोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या अपघातामुळे मुंबईच्या दिशीने जाणारी वाहतूक ठप्प (E-Way Traffic Jam) झाली होती. पोलिसांच्या प्रयत्नांमुळे 6 वा वाहतूक सुरळीत झाली.

IND vs SA, Match Highlights: कार्तिक-पांड्याची दमदार फलंदाजी, मग आवेशची भेदक गोलंदाजी; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय, मालिकेतही बरोबरी

खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अमोल धाईगुडे म्हणाले की, तिन्ही ठिकाणची अपघातग्रस्त वाहने बाजूला करून आता मुंबईच्या दिशेची वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.

पहिल्या अपघातातील ट्रेलर बाजूला केला आहे. दुसऱ्या अपघातात टँकरने कंटेनरला मागून धडक दिली तर तिसऱ्या अपघातातील आयशर टेम्पो बाजूला केला आहे. 10 ते 15 वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. या अपघातांमुळे मुंबईच्या दिशेची वाहतूक ठप्प होती.

ते पुढे म्हणाले की, तिसऱ्या अपघातील आयशर टेम्पोचालक गंभीर जखमी झाला होता. खोपोली नगरपालिकेच्या हॉस्पिटलला त्याला नेण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.