Economic Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाला घटनात्मक चौक – अजित पवार

एमपीसी न्यूज – सर्वसाधारण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या (Economic Reservation) दुर्बल घटकांना दिलेले दहा टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयात कायम राहिल्याने समाजातील एका मोठ्या आणि गरजू घटकासाठी विकासाची दारे प्रशस्त झाली आहेत. आर्थिक आरक्षणाला घटनात्मक चौकट लाभली आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक, क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत केले आहे.

सामाजिक न्यायाच्या चळवळीला आर्थिक निकषाचा आयाम मिळाला आहे. सर्वसाधारण वर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाच्या हक्कावर शिक्कामोर्तब करणारा सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयाचे राजकारण होऊ नये. राजकारणाच्या पलीकडे जाऊन याकडे बघण्याची गरज आहे असेही अजित पवार म्हणाले.

pimpri news: पिंपरी येथील विशाल मल्टिप्लेक्स थिएटर येथील हर हर महादेव चित्रपट संभाजी ब्रिगेडच्या वतीने बंद पाडण्यात आला

आर्थिक दुर्बलांच्या या विजयी लढ्याप्रमाणे (Economic Reservation) मराठा, ओबीसी, धनगर, मुस्लिम बांधवांच्या हक्काचा लढाही यशस्वी होईल, याची खात्री आहे. त्यासाठी राज्य शासनाने सर्व पक्षांना सोबत घेऊन युद्धपातळीवर प्रयत्न करावेत असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.