Pune : डेक्कन एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बिनविरोध

एमपीसी न्यूज – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषदेची (Pune) पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक समितीचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी आज केली.

राजश्री ठकार, रवींद्र आचार्य, खेमराज रणपिसे, प्रमोद रावत, गणेश हिंगमिरे, शरद आगरखेडकर, मकरंद पाटील, अनिल भोसले, प्रीती अभ्यंकर, मिलिंद कांबळे, राजेंद्र जोग, विवेक मठकरी, अशोक पलांडे, अमित कुलकर्णी (सर्व पुणे), उषा मराठे, सुषमा घुमरे (दोन्ही मुंबई), अनंत जोशी, अमित कुलकर्णी, सारंग कोल्हापुरे (सर्व सातारा) आणि विश्राम लोमटे, रवींद्र ब्रम्हनाळकर (दोन्ही सांगली), अशी बिनविरोध निवड झालेल्या 21 सदस्यांची नावे आहेत.

Chinchwad : दहा वर्षीय धनिस्ता गुनसेकरनची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; 11 मिनिटे 22 सेकंद स्प्लिट पोज रेकोर्ड

पुण्यातून चौदा, साताऱ्यातून तीन आणि मुंबई व सांगलीतून प्रत्येकी दोन सदस्यांचा नवीन परिषदेत समावेश आहे. मागील पंचवार्षिक परिषदेतील दहा सदस्यांची फेरनिवड झाली आहे. सर्व नवनिर्वाचित सदस्यांची मुदत डिसेंबर 2028 पर्यंत असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.