Pune : विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळण्यासाठी शारीरिक कष्ट कमी व्हावेत – राहूल गरड

एमपीसी न्युजू – दुर्गम, आदिवासी भागातील (Pune) विद्यार्थ्यांना दर महिन्याला 25 ते 30 सायकलचे वाटप केले जाते. सूर्यदत्तला 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळे रायगड जिल्ह्यातील म्हसाळ येथील 25 विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे शारीरिक कष्ट कमी होऊन त्यांना अभ्यासाला वेळ मिळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.” असे मत राहुल गरड यांनी मांडले.

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील सूर्यभवनमध्ये आयोजित या दिव्यांग मुलांच्या स्नेहमिलनात जादूचे प्रयोग, नृत्याविष्काराचे सादरीकरण, खाऊ वाटप, फुग्यांची उधळण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप असे उपक्रम घेण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी आयोजित ‘जल्लोष 2023’ (ट्रिओ सेलेब फेस्ट 2023) आनंद मैत्रीचा, उत्सव नात्यांचा व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप या सांस्कृतिक कार्यक्रमावर इंडिया स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड्स अशा एकूण चौदा विश्वविक्रमांची मोहोर उमटली.

Pune : डेक्कन एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बिनविरोध

मुलांच्या 21 व आदिवासी भागात 22 शाळांमधून 600, तर सूर्यदत्त नॅशनल स्कूलचे 600 असे एकूण 1200 विद्यार्थी एकत्रित येऊन नववर्ष व ख्रिसमस नाताळ सण सलग चार तास विविध उपक्रमातून साजरा करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित झाला. यामध्ये इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्स, रिपब्लिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, उत्तरप्रदेश वर्ल्ड रेकॉर्ड्स, युके वर्ल्ड रेकॉर्ड्स, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, वुमेन्स वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंडियन आयकॉन रेकॉर्ड्स, इंटर्नशनल वुमेन्स वर्ल्ड रेकॉर्ड्स, उत्तराखंड बुक ऑफ रेकॉर्ड्स, होप इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड्स, आसाम बुक ऑफ रेकॉर्ड्स, बंगाल बुक ऑफ रेकॉर्ड्स या चौदा विश्वविक्रमांचा यात समावेश आहे. यासह लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्ससाठी याची नोंदणी करण्यात आली आहे.

‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, समाजकल्याण विभागाचे अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, सकाळ सोशल फाऊंडेशनचे राहुल गरुड, लायन्स क्लबच्या संचालक (दिव्यांग कल्याण) सीमा दाबके यांच्या हस्ते गुणी मुलांचे कौतुक करण्यात आले. प्रसंगी डॉ. शीतल बागुल, माधुरी पंडित, शांतिदूत परिवारच्या सदस्य तृषाली जाधव आदी उपस्थित होते. दिव्यांगांसाठी काम करणारे मुख्याध्यापक, शिक्षक, सोशल वर्कर्स, मानस शास्त्रज्ञ, काळजीवाहक अशा 25 जणांचा ‘सूर्यदत्त सुर्यभारत सूर्यगौरव पुरस्कार 2023’ने सन्मान करण्यात आला.

“दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये मला देव दिसतो. त्यांच्यात अफाट ऊर्जा असते. दिव्यांगांकडे आपण काहीतरी कमतरता आहे, असे न बघता त्यांना देवानी दिलेली ही देणगी आहे, असे पाहिले पाहिजे. दिव्यांगांचे जीवनमान उंचावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनाही आपले आयुष्य सर्वसामान्य मुलांप्रमाणे जगता यावे. यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सूर्यदत्त दरवर्षी राबवते यंदा या उपक्रमाची नोंद विश्व विक्रमात झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने दिव्यांग मुले, सर्वसामान्य मुले, दुर्गम भागातील मुले एकत्र येऊन नववर्ष, ख्रिसमसचे स्वागत करत आहेत. पहिल्यांदाच असा उपक्रम होत आहे. या मुलांसाठी कार्यरत संस्थांचे कार्य कौतुकास्पद आहे,” असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.