Wakad : व्हिडिओ लाईक व शेअर करून पैसे कमवण्याचे आमिष दाखवत सॉफ्टवेअर इंजिनिअरची 17 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – युट्युब व ब्लॉगचे व्हिडिओ लाईक व शेअर करून पैसे (Wakad ) कमाविण्याचे आमिष एका सॉफ्टवेअर इंजिनियरला चांगलेच महागात पडले आहे. संबंधित तरुणाकडून वेगवेगळे टास्क करून घेत त्याची तब्बल 17 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा सारा प्रकार 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घडला आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि.15) संबंधित तरुणांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून करिष्मा नामक फोनवरून बोलणारी महिला त्यानंतर टेलिग्राम आयडी व विविध बँक खात्याच्या धारकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : दहा वर्षीय धनिस्ता गुनसेकरनची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; 11 मिनिटे 22 सेकंद स्प्लिट पोज रेकोर्ड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला करिष्मा नावाच्या व्यक्तीने फोन केला संबंधित राहिलेले फिर्यादीला ब्लॉग व युट्युबचे व्हिडिओ लाईक करण्याचा टास्क सांगितला. त्यातून दिवसाला दोन हजार रुपये कमवता येतील असे आमिष दाखवण्यात आले. यावरून फिर्यादी यांनी सुरुवातीला काही फ्री टास्क केले. त्यानंतर फिर्यादीला प्रीपेड टास्क देण्यात आले. सुरुवातीला हजार रुपये व त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या बँक (Wakad ) खात्यावर रक्कम पाठवण्यास सांगून विविध टास्क करून घेण्यात आले. मात्र यानंतर फिर्यादीला असता गावात कोणतीही रक्कम परत न करता त्यांची ऑनलाइन पद्धतीने 17 लाख 61 हजार 950 रुपयांची फसवणूक करण्यात आली. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.