Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी मंगळवारी ब्लॉक

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे दरम्यान असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्याच्या कामासाठी (Express Way ) ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मंगळवारी (दि. 21) दुपारी बारा ते दोन या वेळेत घेतला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर किलोमीटर 35/500 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. मंगळवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत या लांबीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.

या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने द्रुतगती मार्गाच्या किलोमीटर ०८/200 येथील शेडूंग फाटा येथून वळवून रा.म.मा. क्र. 48 जुना मुंबई पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट किलोमीटर 42/100 येथून पुन्हा द्रुतगती मार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.

Pimpri : मती भ्रष्ट, क्रिया नष्ट भोंदू बाबा; बागेश्वर महाराजांवर संभाजी महाराज देहूकर यांची टीका

तसेच गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी दोन वाजता द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा (Express Way ) सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.