Express Way News : द्रुतगती मार्गावरील दुर्घटनेत तिघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर केमिकल (Express Way News) घेऊन जाणाऱ्या टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिट येथे केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला आणि टँकरने अचानक पेट घेतला. आगीने रुद्र रूप धारण केले. द्रुतगती मार्गावर असलेल्या उड्डाण पुलावर ही घटना घडली. आगीचे लोट पुलाखाली देखील पडले. दरम्यान पुलाखालून जाणाऱ्या एका दुचाकीवर हे आगीचे लोट पडल्याने त्यातील दोघांचा मृत्यू झाला. तर टँकर जवळ एकाचा मृत्यू झाला आहे.

या घटनेत एकूण तिघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टँकरने पेट घेतल्यानंतर आगीचे लोट पुलाखाली पडल्याने पुलाखाली पार्क केलेली वाहने देखील जळून खाक झाली आहेत.
द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा
या घटनेनंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच पुण्याकडे येणारी वाहतूक देखील काही काळ बंद करण्यात (Express Way News)  आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.