Social Media News : आजपासून भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर बंद?

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी देण्यात आलेली मुदत उलटून गेल्याने फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर बंदीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. त्यामुळे, भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर बंद होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.  किंबहुना येत्या 2 दिवसांमध्ये या माध्यमांवर बंदीही आणली जाण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्यातच केंद्र शासनानं या समाज माध्यमांच्या कंपन्यांना त्यांच्या धोरणांमध्ये बदल करत नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले होते. यासाठी देण्यात आलेली वेळेची मर्यादा 25 मे रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळं आता केंद्र सरकार कडून या समाजमाध्यमांवर आजपासूनच निर्बंध आणण्याची कारवाई होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

ट्विटरने मागितला आणखी वेळ
केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचा आपण आदर करत असल्याचं सांगत त्या अंमलात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरु असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. तर, ट्विटरकडून यासाठी आणखी सहा महिन्यांचा वाढीव वेळ मागण्यात आला आहे. भारतीय ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Koo Appनं सरकारचे नियम अंमलात आणले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.