Pimpri: केंद्र सरकारच्या फसव्या घोषणा, काँग्रेसची मोरवाडीतील भाजप कार्यालयासमोर मूक निदर्शने

False declarations of the Central Government, silent protests of the Congress in front of the BJP office in Morwadi.

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसने मोरवाडीतील  शहर भाजप  कार्यालयासमोर आज (शुक्रवारी) मूक निदर्शने केली. केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने मोरवाडीतील भाजपा मध्यवर्ती कार्यालायसमोर झालेल्या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, शहर युवक काँग्रेसचे विशाल कसबे, कुंदन कसबे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, तुषार पाटील उपस्थित होते.

कोरोनाच्या महामारीच्या काळात रोजगार हिरावले गेले असताना, जनता प्रचंड आर्थिक तणावात असताना , केंद्र सरकारने जनतेच्या भावनांशी खेळत आश्वासनांची खैरात केली.

उद्योजक व नागरिकांना सुमारे 20 लाख कोटी रुपयांचे गाजर पॅकेजची घोषणा केली ,मात्र प्रत्यक्षात नागरिकांची फसवणूक झाली आहे. या विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे केला आहे.

कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते.

अद्याप या  घोषणेची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून न झाल्याने शेतकरी, महिला, उद्योजक, युवक सर्वच नागरिकांना अनेक समस्यांचा समाना करावा लागत आहे.

केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने  राज्यभरात आंदोलन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.